सातारा जिल्ह्यातील माणदेश म्हणजेच औंध चा परिसर होय .पूर्वी हा परिसर बारा महिने पावसाचा होता.कालांतराने हा भाग उजाड झाला .जावळीचे खोरे म्हणजे घनदाट जंगलाचा प्रदेश सूर्य किरणाचा प्रवेश धरित्री पर्यंत होणे मुश्कील होते .निबिड जंगलामुळे हा परिसर अंधकारमय होता .औंध शब्दाचा अर्थ अंधार ,तो या मुळेच.या प्रदेशात यमाई ने औन्धासुराचा वध केला व हा परिसर मुक्त केला तेंव्हापासून हा परिसर मूळ गिरी म्हणून ओळखला जातो.पूर्वी या परिसरास कंटकगिरी म्हणून ओळखला जात असे .
No comments:
Post a Comment