निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव,शकुन सांगावया आले ‘यमाई’ माझे नाव I
तये नगरी वस्ती केली मी तरी आले एकभावे,
ऐसा माझा शकुन दादा चित्त देऊनी ऐकावे I
कैकाय कैकाय बाबा दुरील माझा देश ,
शकुन सांगावया मी आले कलियुगास ,
ब्रम्हा विष्णूमहेश पुसती शकुन आम्हास
ऐसे निदान आम्ही सांगितले त्यास I
धरित्री आकाश मज देखता उत्पती
चंद्र सूर्य दादा मज देखता होती,
ब्रम्हा विष्णूमहेश मज देखता उपजती
जेथे आहे शिव तेथे आदिशक्ती I
दाही अवतार मज देखता झाले
अकराही रुद्र होऊनिया गेले ,
अठ्ठ्यांशी ऋषी मज देखता जन्मले ,
ब्रम्हादि तेहतीस कोटी देव खेळविले I
अठ्ठावीस युगे झाली कौरव पांडव गेले दादा नेणो किती,
छप्पन्न कोटी यादव गेले दादा कोण पंथी,
आम्ही तुम्ही जाऊ मागे कोणी न राहती I
पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल ,
बहिण भावा दोघा जणाचा विवाह लागेल
पाच वरुषांची बाला भ्रतार मागेल,
सहा वरुषांची नारी गर्भिणी होईल I
आणिक एक दादा माझा ऐकावा बोल
पृथीवरी वारा झुंझार सुटेल,
थोर थोर दादा पर्वत उडोनी जातील
अठराही जाती एके ठिकाणी जेवतील I
कलियुगाची दादा ऐकावी थोरी
पुत्र तो पित्याचा होईल वैरी
भ्रतार सोडोनी घरोघरी फिरतील नारी
ऐसा माझा शकुन दादा ऐका निर्धारी I
आणिक एक दादा माझे ऐका उत्तर
आकार जाईल अवघा होईल निराकार II
जाती चंद्र सूर्य मग पडेल अंधकार,
धरित्री आकाश जाईल मग कैचा दिनकर I
आणिक एक शकुन माझा ऐकावा संती
तुम्ही मूळपीठी राहणे नाव माझे आदिशक्ती ,
अंबेचा व्यवहार त्राहे त्राहे आदिमुर्ती
एका जनार्दनी प्रसन्न झाली आदिशक्ती I
शब्द चुकलेत या मधे
ReplyDeleteखुप खुप धन्यवाद
ReplyDeleteThank you so much 😊👍
ReplyDeleteकलियुगाच सत्य सांगितलं संत एकनाथ महाराज यांनी ❤️
ReplyDelete