यमाई देवी व ज्योतिबा ह्यांची उपासना करणारे लाखो लोक कर्नाटक व महारष्ट्रात पसरलेले आहेत.यमाई देवीची मंदिरे अनेक ठिकाणी आहेत परंतु मुल पीठ मात्र औंध मधेच आहे. कनेरसर ,बावी,राशीन,कवलापूर,कोल्हापूर, ज्योतिबा डोंगर,मार्डी सोलापूर, कवठे,राखेल,इस्लामपूर व इतर अनेक ठिकाणी यामैची मंदिरे आहेत.मूळ नक्षत्रावर कंटकगिरी येथे यमाईने औंधसुराचा वध केला ते ठिकाण म्हणजे औंध होय.
औंध हे देवस्थान सातारा जिल्ह्यात ,खटाव तालुक्यात आहे .माणदेशी यमाई असेही तिला म्हटले जाते .
शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव व औन्धाची अंबाबाई असेही ओळखले जाते.
कोल्हापूरच्या अंबाबाईने तिला ये -माई अशी हक मारली व तसेच ज्योतीबानेही तिला हक मारली व तिच्या मोठेपणाचा गौरव केला,म्हणून तिला यमाई किंवा अंबाबाई म्हणून ओळखले जाते.
श्री यमाई म्हणजे पार्वतीचा अवतार आहे. म्हणून तिच्या समोर नंदी आहे म्हणून हिला श्री आई आदिपुरुष म्हणून संबोधले जाते.
No comments:
Post a Comment