Powered By Blogger

Sunday, October 31, 2010

आरती

औंध ग्रामीचा डोंगर चढुनी आले गडावर या ,
भेटीस जाण्या त्रिगुणात्मक  त्या माय यमाईला II
 बालपणीची आठवण  झाली पाहुनी आदिमाया ,
जीवन माझे कृतार्थ झाले करिता तुझी सेवा I
औंधासुर हा मर्दन करुनी आदिजगत जननी ,
शांत व्हावया औंधवासिनी बसली गडावरही II
 मंदिरी तुझिया पाउल पडता अंतरी वास तुझा,
 नतमस्तक हे क्षणात झुकले मंगलचरणी तुझ्या II
तव पूजेने कर हे माझे आज पुनीत होती,
भावफुलाची गुंफुनी माला घालीत तव कंठी
मनात चिंतन तुझे निरंतर चित्त तुझे  ठायी II
विश्वव्यापीनी नाम तुझे गे गाते वैखरीही,
 दो नेत्राच्या तेजदीप्तीने करिते आरती मी ,
अहंकार हा झाडूनी सगळा भरिते ओटीला II
पतितपावन श्रीरामाला दर्शन तू देसी ,
औंध नृपतीच्या भक्तीसाठी औंध ग्रामी येशी  II
त्या भक्ताचे संकट हरुनी तया भगिनी होसी ,
प्रसूती समई  सुईण  होऊनी पत्नी सोडविसी II
बाळाचे ते नाम ठेविसी परशुराम तथा,
औंध ग्रामीचा पुण्यपुरुष हा वंदित तव पाया II



Saturday, October 30, 2010

कुलस्वामिनी मानसपूजा

कुलस्वामिनी स्तुती

Gondhal

यमाई माझे नाव

                                                            यमाई माझे नाव 

                                
निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव,शकुन सांगावया  आले ‘यमाई’ माझे नाव I
तये नगरी वस्ती केली  मी तरी आले एकभावे,
 ऐसा माझा शकुन दादा चित्त देऊनी ऐकावे I
कैकाय कैकाय बाबा दुरील माझा देश  ,
शकुन सांगावया मी आले कलियुगास ,
ब्रम्हा विष्णूमहेश पुसती शकुन आम्हास
ऐसे निदान आम्ही सांगितले त्यास I
धरित्री आकाश मज देखता उत्पती
चंद्र सूर्य दादा मज देखता होती,
ब्रम्हा विष्णूमहेश मज देखता उपजती
जेथे आहे शिव तेथे आदिशक्ती I
दाही अवतार मज देखता झाले
अकराही रुद्र होऊनिया गेले ,
अठ्ठ्यांशी  ऋषी मज देखता जन्मले ,
ब्रम्हादि  तेहतीस कोटी देव खेळविले I
अठ्ठावीस युगे झाली कौरव पांडव गेले दादा नेणो किती,
छप्पन्न  कोटी यादव गेले दादा कोण पंथी,
आम्ही तुम्ही जाऊ मागे कोणी राहती I
पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल ,
बहिण भावा दोघा जणाचा विवाह लागेल
पाच वरुषांची बाला भ्रतार मागेल,  
सहा वरुषांची नारी गर्भिणी होईल  I
आणिक एक दादा माझा ऐकावा बोल
पृथीवरी वारा झुंझार सुटेल,   
थोर थोर दादा पर्वत उडोनी जातील
अठराही जाती एके ठिकाणी जेवतील I
कलियुगाची दादा ऐकावी थोरी
पुत्र तो पित्याचा होईल वैरी  
भ्रतार सोडोनी घरोघरी फिरतील नारी
ऐसा माझा शकुन दादा ऐका निर्धारी I
आणिक एक दादा माझे ऐका उत्तर
आकार जाईल अवघा होईल निराकार II
जाती चंद्र सूर्य मग पडेल अंधकार,
धरित्री आकाश जाईल मग कैचा दिनकर I
आणिक एक शकुन माझा ऐकावा संती
तुम्ही मूळपीठी  राहणे नाव माझे आदिशक्ती ,
अंबेचा व्यवहार  त्राहे त्राहे आदिमुर्ती
 एका जनार्दनी प्रसन्न झाली आदिशक्ती I