Powered By Blogger

Saturday, November 13, 2010

भगवतीची परापुजा


                                                            

मूर्ती पुजेपेक्षा मानस पूजा श्रेष्ट पण त्यापेक्षाही श्रेष्ट परा पूजा आहे .ही शंकराचार्याची परापूजा फारच उच्च कोटीची आहे.परमेश्वराचे स्वरूप नित्य आपल्या अंत :करणात राहिले तर त्यासारखी उत्कृठ दुसरी पूजा नाही .
अखंड सच्चिदानंद निर्विकार निराकार भेदशून्य एकरूप अशा या परब्रह्मस्वरूपी अद्वैत चित्तामध्ये स्थिर झाल्यानंतर परमेश्वराची कशी पूजा करणार ?
जो परमात्मा सर्व विश्वाला व्यापून राहिला आहे त्याचे आवाहन कोठे कसे करणार? आवाहन म्हणजे दूर असलेल्याला आदराने जवळ बोलावणे ,जो नेहमीच जवळ आहे ,तो नाही असे स्थानच नाही ,तर मग त्याचे आवाहन कसे करणार ?जो सर्वांनाच आधार आहे ,आश्रयस्थान आहे ,त्याला आसन कश्याचे देणार ? जो   स्वभावात: स्वच्छ आहे ,त्याला हातपाय धुण्याला  अर्घ्य  आणि पाद्य कसे द्यावे?                  जो  शुध्ध आहे त्याला आचमन कशा करिता द्यावे?
जो  सदा सर्वकाळ निर्मल आहे ,त्याला स्नान कसे घालावे ?स्नानाचा त्याला उपयोग काय ?ज्याच्या उदरात सर्व विश्व सामावले आहे त्याला कोणते वस्त्र नेसवावे?त्याला यज्ञोपवीत तरी कसे घालावे ?  यज्ञोपवीत  हे वर्ण ,आश्रम ,गोत्र ,यज्ञयागादि  कर्मे इत्यादीवर अवलंबून असते ,त्याला ब्राह्मण ,क्षत्रिय इत्यादि कोणताही वर्ण नाही ,ब्रह्मचर्य.गृहस्थ  इत्यादि कोणताही आश्रम नाही ,ज्याला कोणतेही गोत्र नाही ज्याला कोणतेहि कर्माधिकार नाहीत त्याला यज्ञोपवीत कसे द्यावे ?  

जो स्वभावत: निर्लेप आहे ,ज्याला कशाचाही लेप लागू शकत नाही .त्याला गंध कसे लावावे?ज्याला कशाचीच वानवा नाही .जो सर्व वासना विन्रिर्मुक्त आहे तो फुलांचा वास कसा घेणार ?त्याला फुले कसी अर्पण करावीत /निर्विशेष म्हणजे सर्वत्र समरूपाने राहून जो सर्व विश्वाला भूषवितो त्याची आम्ही काय आरास करणार/ज्याला काही आकारच नाही त्याला काय अलंकार घालणार ?
जो निरंजन म्हणजे सर्व संसार धर्माच्या पलीकडे आहे त्याला धूप काय घालणार ,जो सर्व साक्षी आहे त्याला दीप काय अर्पण करणार, जो स्वस्वरूपच्या आनंदातच नित्य तृप्त आहे त्याला नैवेद्याचा काय उपयोग ?त्याला नैवेद्य कशाचा दाखवावायाचा  तो का दाखवावायाचा ?
जो विश्वाला आनंद देतो त्याला मुखशुध्दीकरीता तांबूल अर्पण करून आम्ही काय आनंद देणार ?त्याला तांबूल कसा अर्पण करावयाचा ? जो स्वयं प्रकाशचा चिद्रूप आहे ,सूर्य ,चंद्र आणि अग्नि इत्यादिकानाही प्रकाशित करणारा आहे, अशा रीतीने वेदाकडून ज्याचे वर्णन केले आहे त्याला आम्ही निरांजन दीप दाखवून काय प्रकाशित करणार ?
जो विश्वम्भर आणि अनंत आहे त्याला आम्ही दक्षिणा काय देणार ?आणि प्रदक्षिणा तरी कशी घालणार ?जो अद्वितीय  एकरूप आहे त्याला नमन कसे करणार ?
वेदानाही ज्याचे स्वरूप आकलन होत नाही,वेदही ज्याचे वर्णन करताना मौनावतात, त्याचे आम्ही स्तुती स्तोत्र काय गाणार ?
जो आतबाहेर सर्वत्र परिपूर्ण भरलेला आहे त्याचे उद्वासन विसर्जन कसे करणार ?याप्रमाणे ब्र्ह्मवेत्या लोकांनी सदासर्वकाळ सर्व देवाचा अधिपती सच्चिदानंद  भगवान श्रीहरी जो परमात्मा त्याची एकाग्र बुद्धीने सर्व अवस्था मध्ये पूजा करावी.
.

                        भगवतीची परापुजा 

1 comment:

  1. bhakyi kasi karaavi yaa sambandhi margdarshan milale.pharach surekh maahiti aahe.

    ReplyDelete