आरती यमाई देवीची
अनन्य भावे शरण पदासी पंचारती करिते ,अंबिके... चंडिके.... देई अभयाते.........
अनन्य भावे शरण पदासी पंचारती करिते ,
विश्वाच्या या तेजामधुनी दीपची पाजळीले
आरती करीता ‘मी’ पण माझे विरोनिया गेले.
प्रकाश माझ्या अंतरी उजळे लीन तुझ्या पायी उदयोस्तु आई.....
अनन्य भावे शरण पदासी पंचारती करिते
अघोरी त्झे ते पूजन करुनी म्हणती उपासकही........
मांत्रिक तांत्रिक कापालिक ते दुष्ट मोहमायी
जारण मारण मोहिनी बंधन लोक नाडलेही.........
कित्येकांचा संसारांची धूळधाण होई
भूत पिशांचा समंधाना जागर हे करिती
जन्मोजन्मीचे हेवे ते साध्य करुनी घेती
मुठमारीची अघटित करणी घाला झणी घाली......
दु:ख , क्लेश त्या परपीडेने लोक गांजलेही
जगत मोहिनी चौसष्ट योगिनी नवदुर्गे पाही
आई तू गे या विश्वाची देई अभयाते.......
खेळ तुझा हा आहे जरीही मनास कळले ही
तरीही तुझे पाय धरुनी सांगत तुजलाही
तुझ्या वाचूनी नाही कुणीही तारणार जगही
जादुगार तू जादू तुझी ही आवरी अंबेही
दु:ख पाहुनी पीडा पाहुनी मन हे हळहळले...........
घळघळ अश्रू नयनामधुनी तव पायी गळले
अनाथ जीवा सनाथ करुनी तूच मार्ग दावी
आनंदाची भाजी भाकरी आई तूच चारी
अघोरी माया दूर सारी गे पूजन मी करिते.........
आरती मी करिते .... आरती मी करिते ........