श्री कालरात्रीदेवी
कल्पांत कालीन रात्र . विश्व प्रलयाच्या वेळी संहार कारिणी पराशक्ती महाकाला मध्ये विलीन होते त्यावेळी सर्वत्र घोर अंधाराचे साम्राज्य पसरते . या प्रलयापूर्व अंधाकाराचे प्रतिक म्हणून तंत्र शास्त्रात काळरात्रीची कल्पना केलेली आहे . यातला रात्री शब्द अंधकाराचा सूचक आहे .कालरात्री नावाचा एक प्राचीन तंत्र ग्रंथ आहे .त्यात कालारात्रीच्या उपासनेचे विधान दिलेले आहे . या कालारात्रीचे ८४ भेद मानलेले आहेत .त्याचे पृथक मंत्र आहेत,यंत्रेही आहेत ,त्याच्या सिद्धीही वेगवेगळ्या आहेत .
उपासनेचे प्रकार - अमावास्येच्या रात्रीला कालारात्रीचे प्रतिक मानून तिचे मोहरात्री .दारुण रात्री ,महारात्री व कालरात्री असे चार विभाग केलेले आहेत .निशासाधना,भैरवी साधना ,काली साधनाव प्रकृती साधना अशा त्या चार विभागाच्या अनुक्रमे साधना सांगितलेल्या आहेत . कालरात्रीच्या उपासनेला कार्तिकी अमावास्या हि विशेष सांगितली आहे श्री विद्यार्णव तंत्रात कालरात्रीचे स्वरूप पुढीलप्रमाणे सांगितले आहे .
रक्तवर्ण ,चत्रभुज .उजव्या हाती लिंग ,दुसर्या हाताची वरद मुद्रा ,दोन डाव्या हाती भुवन व अधोदंड .त्रिनेत्र ,मुक्तकेशी ,मस्तकी मयूर पत्र धारण करणारी व कामातुर .
कालरात्रीचे यंत्र-बाहेरच्या वर्तुळात सोळा पाकळ्या व आतल्या वर्तुळात आठ पाकळ्या ,त्याच्या आत षट्कोन,त्यात वर्तुळ व वर्तुळात बिंदू अशीच या यंत्राची रचना असते .या यंत्रावर काळरात्रीची स्थापना व पूजा करतात कामना परत्वे कालरात्रीचे भिन्नभिन्न विधाने सांगितलेली aaa
यमाई देवीच्या रुपात जी काही स्थित रुपात चिन्हे आहेत. उदा देवीच्या हातात त्रिशुल, डमरू आहे.देवी वाहन नंदी आहे. शेजारी गणपती आहे.मस्तकी शिवलिंग, नाग आहे.
ReplyDeleteयावरून देवीचे हे रुप महागौरी रूपाशी साधर्मय दर्शक रुप आहे.