श्री यमाई देवीच्या नावे चांगभले
श्री जोतिबाच्या नावे चांगभले
असा उदघोष करीत लोक देवाचे दर्शन घेतात .दक्षिण केदार म्हणजे जोतीबा,याचे ठाणे वाडी रत्नागिरी येथे आहे .कोलासुर व करवीर या असुराच्या वधासाठी श्री महालक्ष्मीने श्री केदाराना बोलाविले. असुर वधानंतर श्री महालक्ष्मीने श्री केदाराना राज्याभिषेक केला व दक्षिणापती घोषित केले व त्याना विनंती केली कि तुमची नजर सदैव आमच्यावर राहू दे . म्हणून जोतिबाची नजर कोल्हापूरकडे आहे म्हणजेच दक्षिण दिशेकडे आहे .कोल्हापुराच्या वायव्य दिशेला जोतिबाचा डोंगर येतो .वायव्य दिशेला सिंध प्रांत येतो सिंध प्रांतातून आलेले जोतीबा कोल्हापूर येथे स्थिरावले .'चंगा भले' म्हणजे लोकाचे चांगले भले केले ' असे महालक्ष्मी जोतीबाना म्हणाली .तेव्हा पासून हा जय घोष सुरु झाला.चैत्र प्रतिपदे पासून यात्रा सुरु होते व पौर्णिमेला संपते याला पाकाळणी असे म्हणतात या दिवशी जोतिबाची स्वारी श्री यमाई देवीला भेटण्यास जाते त्यावेळी 'यमाई च्या नावे चांगभले असा जय घोष करतात
No comments:
Post a Comment