Powered By Blogger

Monday, November 1, 2010

यमाई देवीचा गोंधळ

यमाई देवीचा गोंधळ

मायेचा निजरूप आईचा गोंधळ मांडिला,
उदे अंबाबाई गोंधळा ये
मूळपीठाची यमाई गोंधळा ये
शिंगणापुराच्या महादेवा गोंधळा ये
कराडची उत्तरालक्ष्मी गोंधळा ये
नरसिंहपुराच्या  नरसिहा गोंधळा ये
रत्नागिरीच्या केदारा गोंधळा ये
कोल्हापूरची अंबाबाई गोंधळा ये
 तुळजापूरची भवानी  गोंधळा ये
म्हसवडच्या सिध्दनाथा गोंधळा ये
पसरणीच्या भैरवनाथा गोंधळा ये
जरंडयाच्या जरंडेश्वरा गोंधळा ये
किन्हईची अंबाबाई गोंधळा ये
बनपुरीच्या नाइकबा गोंधळा ये
पालीच्या खंडोबा गोंधळा ये ,
कडेगावची डोंगराई गोंधळा ये  ,
भूषणंगडची  हरणाई गोंधळा ये ,
वर्धनगडची वर्धिनी गोंधळा ये ,
साताराची मंगळाई गोंधळा ये ,
मांडरगडची काळूबाई गोंधळा ये
विट्याची सूळकाई गोंधळा ये ,
चोराड्याची खडीआई  गोंधळा ये ,
एतगावच्या धर्मराजा  गोंधळा ये
ललगुणच्या नागोबा  गोंधळा ये ,
वीराच्या म्हस्कोबा गोंधळा ये  ,
गुरसाळ्याच्या रामेशा गोंधळा ये ,
खरसुंडीच्या  सिध्दनाथा गोंधळा ये ,
सोनारीच्या सिध्दनाथा गोंधळा ये ,
सज्जन गडची आंग्लाई गोंधळा ये
धोमच्या नरसोबा गोंधळा ये ,
फलटणच्या श्रीरामा गोंधळा ये
चाफळच्या रामा गोंधळा ये ,
कुरोलीच्या सिध्देशा गोंधळा ये ,
रेणावीच्या रेवणसिध्दा गोंधळा ये ,
पुसेसावळीच्या सावळेशा गोंधळा ये
येराडवाडीच्या येडोबा गोंधळा ये ,
कोरेगावच्या भैरवनाथा गोंधळा ये
नवलाख तारांगण गोंधळा ये
तेहतीस कोटी देवा गोंधळा ये ,
राहिले साहिले गोंधळा ये
स्थळ पांढरी गोंधळा ये ,
चौसष्ट योगिनी गोंधळा ये
 कृष्णा  कोयनामाई गोंधळा ये
मुळ पीठ नायिके यमाई  गोंधळा ये.


No comments:

Post a Comment