पौष पौर्णिमा म्हणजे देवीचा यात्रेचा दिवस. मुल नवरात्र पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत असते. पौर्णिमेदिवशी रथोत्सव होतो या उलट शारदीय नवरात्र हे व्रतोत्सव नवरात्र आहे. अनेक कुळांमध्ये पौशातील मंगळवारी देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे. श्री शाकंभरी, यमाई व भुवनेश्वरी या तिन्ही एक स्वरूपच आहेत.