Powered By Blogger

Thursday, April 28, 2011

Thursday, April 14, 2011

yamaidevi parivar

vardhini mata

haranaaidevi

shambhu mahadev
औंध हे गाव औंध असुराच्या नावाने वसले आहे .येथे श्री आदिमाया यमाई देवीचे वास्तव्य तर आहेच तिलाच श्री आई आदि पुरुष किवा मूळपीठ नायिका असेही म्हटले जाते .औन्धासुराला अमर केले व अग्रपूजेचा मानहि दिला .प्रथम औन्धासुराचे दर्शन घेऊन मग देवीचे दर्शन घेण्याचा प्रघात आहे .तिच्या परिवार देवतांमध्ये तुकाई देवी,मोकलाई देवी ,हरणाई देवी ,मोरजाईदेवी इत्यादी देवतांचा समावेश होतो .क्षेत्र दर्शनामध्ये शिखर शिंगणापुराचा शंभू महादेव,भूषण गडची हरणाई देवी ,कडेगावची डोंगराई देवी,वर्धनगडची  वर्धिनी माता समाविष्ट होतात.श्री महालक्ष्मी देवी व श्री जोतिबांनी तिला ये माई म्हणून गौरव केला तेव्हा पासून ती यमाई देवी म्हणून ओळखली जाऊ लागली.

Friday, April 8, 2011

Shree Yamai Devi Aarti

श्री यमाई देवीची आरती 

जय देवी जय देवी जय आदिशक्ती 
आरती ओवाळू एकाग्र भक्ती 
निर्गुण जे होते सगुणत्वा आले 
चराचर हे सकळीक तुज पासोनी झाले 
माया वेष्टित जग हे सगुण तवा केले 
त्रैलोक्य सत्य असुनीही झाले 
एसी सगुण तुजला लेणी कांचन जडिताची
अनेक वस्त्रे शोभती कांचन भरिताची 
बैसुनी सिंहासनी  नृत्ये गणिकांची
पाहशी तू नयनी जननी जगताची || 
हरिहर ब्रह्मादिक येती नमनासी
जे जे वर मागती ते ते त्या देशी 
कृपाळू अंबे माते पालन भक्तासी 
परशुरामा दिना करुणाकर होसी ||