Powered By Blogger

Wednesday, November 24, 2010

आरती यमाई देवीची

                                       आरती  यमाई देवीची

अनन्य भावे शरण पदासी पंचारती करिते ,अंबिके... चंडिके.... देई अभयाते......... 
अनन्य भावे शरण पदासी पंचारती करिते ,
विश्वाच्या या तेजामधुनी दीपची पाजळीले
आरती करीतामी’ पण माझे विरोनिया गेले.
प्रकाश माझ्या अंतरी उजळे लीन तुझ्या पायी उदयोस्तु आई.....
अनन्य भावे शरण पदासी पंचारती करिते
अघोरी त्झे ते पूजन करुनी म्हणती उपासकही........
मांत्रिक तांत्रिक कापालिक ते दुष्ट मोहमायी
जारण मारण मोहिनी बंधन लोक नाडलेही.........
कित्येकांचा संसारांची धूळधाण होई
भूत पिशांचा समंधाना जागर हे करिती
जन्मोजन्मीचे हेवे ते साध्य करुनी घेती
मुठमारीची अघटित करणी घाला झणी घाली......
दु: , क्लेश त्या परपीडेने लोक गांजलेही
जगत मोहिनी चौसष्ट योगिनी नवदुर्गे पाही
आई तू गे या विश्वाची देई अभयाते.......
खेळ तुझा हा आहे जरीही मनास कळले ही
तरीही तुझे पाय धरुनी सांगत तुजलाही 
तुझ्या वाचूनी नाही कुणीही तारणार जगही 
जादुगार तू जादू तुझी ही आवरी अंबेही
दु: पाहुनी पीडा पाहुनी मन हे हळहळले...........                                                                   
घळघळ अश्रू  नयनामधुनी तव पायी गळले
अनाथ जीवा सनाथ करुनी तूच मार्ग दावी 
आनंदाची भाजी भाकरी आई तूच चारी 
अघोरी माया दूर सारी गे पूजन मी करिते.........
आरती मी करिते .... आरती  मी करिते ........

Saturday, November 13, 2010

श्री यमाईदेवी मानसपूजा

श्री यमाईदेवी प्रसन्न मानसपूजा
श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती स्वरूपिणी यमाई देवी नमो नम: II
] हे जगदंबिके मी तुला पृथ्वी रूप गंध अर्पण करतो .
]हे जगदम्बिके मी तुला आकाश रूप फुले अर्पण करतो .
]हे जगदम्बिके मी तुला वायुदेवरूपाने धूप अर्पण करतो.
]हे जगदम्बिके मी तुला अग्नी रूपाने दीप दाखवितो.
]हे जगदंबिके मी तुला अमृतासमान नैवेद्य निवेदन करतो.
]हे जगदम्बिके मी तुला सर्वात्मक रूपाने सर्व उपचाराने तुझी पूजा करतो.




मानसपूजा 
लं पृथिव्यात्मकं  गन्धं  परिकल्पयामि 
हं आकाशत्मकं   पुष्पं  परिकल्पयामि
 यं वाय्वात्मकं  धूपं परिकल्पयामि
रं वन्ह्यत्मकं  दीपं परिकल्पयामि
  वं  अमृतात्मकं  नैवेद्यं  निवेदयामि परिकल्पयामि
   सौं  सर्वात्मकं  सर्वोपचारं  समर्पयामि 

                                   आरती

सांज वेळी येई माझी मायलक्ष्मी घरी करीत आरती तुझी मी जय चंडिकेश्वरी
पूर्वजाची हि पुण्याई आज ये फळाला सगुण रूप त्रैलोक्याचे येई हो घराला
अंतरीच्या आसनावरती बससी अम्बिकेही दुधपाणी चरणावरती घालते तुझ्याही 
सुमनहार गुंफियेला करीत पूजनासी पदी नम्र होवोनिया जोडीते करासी 
पंच प्राण पंचारती ही करीत कुरवंडी ही  सांजवात लावियेली भक्तीची पुढेही
तिमिरनाश झाला सारा भ्रांती होई दुरी करीत आरती तुझी मी जय चंडीकेश्वरी
अनावृष्टी होवोनिया धरणी त्रस्त झाली तुझ्या कृपाविना नाही तिला कोणी वाली
शाक अन्न निर्मोनिया प्रकट तूची होसी अमृताची वृष्टी करुनी लीला दाखविसी
शाकंबरी शताक्षी गे होसी अवतारी मर्दुनिया दुष्काळाचा असुर हाच वैरी
गन्धर्वादि देव सारे स्तुती पाठ गाती आनंदे जयजयकारे करीत पुष्प वृष्टी
तहान भूख भागविसी सकल या जीवांची बनशंकरी माउली वंदिते पदासी
अधर्माचा नाश करुनी स्वधर्मासी तारी करीत आरती तुझी मी जय बनशंकरी
शाक अन्न प्रसादाला अवीट होय गोडी वदनी कवळ घालिता मी तहान भूख गेली
ब्रम्हचैतन्याच्या रूपे प्रगट तूची होसी कुंडलिनी देवता ही जागृत करिसी
अंतरीची छेडली तार लागली समाधी मोह पाश प्रपंचाचे तुटली ही उपाधी
घट्ट धरीत पदराला नाही सोडणार हट्ट मोहनचा माते तूच पुरवणार ग. 


.